|Sunday, October 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बलदेव कुमार यांना जीवे मारण्याची धमकी

बलदेव कुमार यांना जीवे मारण्याची धमकी 

नवी दिल्ली:

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या तहरीफ ए इन्साफ या पक्षाचे माजी आमदार आणि सध्या भारतात वास्तव्यास असलेले बलदेव कुमारसिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे प्रकरण उघड झाले आहे. पाकिस्तानात हिंदू आणि शिख याचे जीव धोक्यात आहेत असे सत्यकथन त्यांनी केले होते. त्यामुळे त्यांना धमक्या मिळत आहेत.  बलदेव कुमार यांनी भारताकडे आश्रय मागितला आहे. पाकिस्तानात आता हिंदू आणि शिख सुरक्षितपणे जीवंत राहू शकत नाहीत. प्रशासनाने त्यांच्या सुरक्षेकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष चालविले आहे. पाकिस्तानातील परिस्थिती सुधारेल, अशी आशा आपण सोडून दिली आहे. तेथे हिंदू व शीख महिलांनाही पळवून सक्तीने धर्मांतर पेले जाते, असे  असे बलदेव कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सागितले.  

महिला पळविण्याचे प्रमाण वाढले

हिंदू आणि शिख महिलांचे अपहरण करून त्यांना जबरदस्तीने इस्लाम धर्माचा स्वीकार करावयास लावणे आणि मुस्लिमांबरोबर त्यांचा विवाह लावून देणे हे प्रकार पाकिस्तानात नित्याचेच झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्या देशात हिंदू आणि शिखांना कोणी त्राता उरलेला नाही, असेही वक्तव्य त्यांनी केले.