|Thursday, September 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » रानू मंडल यांचे ‘तेरी मेरी’ गीत प्रदर्शित

रानू मंडल यांचे ‘तेरी मेरी’ गीत प्रदर्शित 

मुंबई :

गायक हिमेश रेशमिया यांच्यामुळे सोनेरी दिवस आजमावणाऱया रानू मंडल यांनी गायलेले ‘तेरी मेरी’ हे गीत नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. या गीतामुळे सोशल मीडियावर आपल्या आवाजाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवणाऱया रानू मंडल यांची वाटचाल बॉलिवूडच्या दिशेने झाली आहे.  रेल्वेमध्ये लता मंगेशकर यांची गाणी गात आपले पोट भरणाऱया रानू मंडल आज यशाच्या मार्गाकडे प्रवास करत आहेत. सध्या ‘इंटरनेट सेंसेशन’ ठरलेल्या रानू मंडलने सर्वांच्या मनात घर केले आहे. आयुष्यातील 10 वर्ष कठीण प्रसंगांना तोंड दिल्यानंतर अखेर त्यांच्या जीवनात सोन्याचा दिवस आला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या ‘तेरी मेरी’ गाण्याला चाहत्यांनी चांगलेच डोक्मयावर घेतले होते. त्यांचा आवाज आता फक्त बॉलिवूडपर्यंतच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटांमधूनही ऑफर्स मिळवत आहे.