|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » क्रिडा » भारत-कतार लढत गोलशून्य बरोबरीत

भारत-कतार लढत गोलशून्य बरोबरीत 

फिफा विश्वचषक पात्रता स्पर्धा : गुरप्रीत सिंग संधूचे अप्रतिम गोलरक्षण

वृत्तसंस्था/ दोहा

भारतीय खेळाडूंनी केलेल्या झुंजार प्रदर्शनामुळे येथे झालेल्या फिफा विश्वचषक पात्रता स्पर्धेतील सामन्यात आशियाई चॅम्पियन व यजमान कतारची अनेक आक्रमणे परतावून लावत त्यांना गोलशून्य बरोबरीत रोखत एक गुण मिळविला.

कर्णधार व प्रमुख खेळाडू असलेला सुनील छेत्री ताप असल्यामुळे या सामन्यात खेळू शकला नाही. त्याच्या गैरहजेरीतही युवा खेळाडूंनी बाराहून अधिक आक्रमणे थोपवत कतारला विजयापासून रोखण्यात यश मिळविले. गेल्या जानेवारीत कतारने आशियाई चॅम्पियनशिप जिंकली होती. भारतीय गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूने भारतातर्फे चमकदार व लक्षवेधी प्रदर्शन केले. छेत्रीच्या गैरहजेरीत संघाचे नेतृत्त्वही गुरप्रीतनेच केले होते. त्याने दर्जेदार अप्रतिम गोलरक्षण करीत अनेक गोल वाचवल्यामुळेच कतारला एकही गोल नोंदवता आला नाही. गट ई मधील हा सामना भारतीयांच्या दीर्घकाळ स्मरणात राहणारा असाच होता. अलीकडच्या काळातील भारताचा हा सर्वोत्तम निकाल असल्याचे मानले जात आहे.

5 सप्टेंबर रोजी गुवाहाटीत झालेल्या सामन्यात भारताला ओमानकडून 1-2 असा निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. दोन सामन्यांतून भारताच्या खात्यावर एक गुण जमा झाला असून कतारने दोन्ही सामने जिंकत 4 गुण मिळविले आहेत. पहिल्या सामन्यात त्यांनी अफगाणिस्तनचा 6-0 असा धुव्वा उडविला होता. या दोन्ही संघांत यापूवीं फक्त एकदाच अधिकृत सामन्यात गाठ पडली होती आणि 2007 च्या विश्वचषक पात्रता स्पर्धेतील सामन्यात कतारने भारतावर 6-0 असे हरविले होते. भारताचा पुढील सामना बांगलादेशविरुद्ध 15 ऑक्टोबर रोजी कोलकात्यात होणार आहे.

येथील एकतर्फी ठरलेल्या या सामन्यात कतारनेच पूर्ण वर्चस्व राखले होते अनेकदा भारतीय गोलरक्षेत्रावर आक्रमणे केली तर भारताचा बराचसा वेळ बचाव करण्यातच गेला. जागतिक क्रमवारीत 62 व्या स्थानावर असणाऱया कतारने भारतीय गोलच्या दिशेने दोन डझनहून अधिक फटके मारले. याउलट जागतिक क्रमवारीत 103 व्या स्थानावर असणाऱया भारताने संपूर्ण सामन्यत फक्त दोनदाच कतारच्या गोलपोस्टपर्यंत धडक मारली होती. त्याने पूर्वार्धात अर्धा डझनहून अधिक फटके अचूक अडविले तर सात कॉनर्स वाचविले. भारताला मात्र एकही हल्ला करता आला नव्हता. 66 व्या मिनिटाला भारताला पहिला कॉर्नर मिळाला होता. गुरप्रीत संधूने अप्रतिम रक्षण करून कतारला यश मिळू दिले नव्हते. प्रमुख प्रशिक्षक इगोर स्टिमाक यांनी ओमानविरुद्ध खेळलेल्या संघात चार बदल केले.

Related posts: