|Thursday, September 19, 2019
You are here: Home » क्रिडा » केविन अँडरसन विश्रांती घेणार

केविन अँडरसन विश्रांती घेणार 

वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग

दोनदा ग्रँडस्लॅम स्पर्धेचे उपविजेतेपद मिळविणाऱया दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन या वर्षीच्या उर्वरित मोसमात विश्रांती घेणार असल्याचे सांगितले आहे. त्याच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यातून सावरत असल्याने त्याने हा निर्णय घेतला आहे.

गेल्या जुलैमध्ये विम्बल्डन स्पर्धेच्या तिसऱया फेरीत पराभूत झाल्यानंतर तो एकाही स्पर्धेत खेळलेला नाही. तसेच गुडघ्याच्या समस्येमुळे त्याने अमेरिकन ओपन स्पर्धेतूनही माघार घेतली होती. पुढील वर्षापर्यंत मी आता खेळणार नाही, असे त्याने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले. 33 वर्षीय अँडरसनने 2017 मध्ये अमेरिकन ओपन आणि गेल्या वर्षी विम्बल्डन स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते.