|Thursday, September 19, 2019
You are here: Home » क्रिडा » ऍलिसनचा केर्बरला धक्का

ऍलिसनचा केर्बरला धक्का 

वृत्तसंस्था/ शांघाय

अमेरिकेच्या ऍलिसन रिस्केने एक सेटची पिछाडी भरून काढत जर्मनीच्या अँजेलिक केर्बरला पहिल्या झेंगझोयु ओपन महिला टेनिस स्पर्धेत पराभवाचा धक्का  दिला. बुधवारी झालेल्या सामन्यात म्लाडेनोविकने स्पेनच्या कॅरोलिना गार्सियाचे आव्हानही 7-5, 6-2 असे संपुष्टात आणले.

ऍलिसनने केर्बरवर 5-7, 6-4, 7-6 (8-6) अशी मात केली. ऍलिसनने तिसऱया सेटमधील टायब्रेकमध्ये एक मॅचपॉईंट वाचवत केर्बरला धक्का दिला. पहिल्या फेरीत पराभूत होण्याची केर्बरची ही सलग चौथी वेळ आहे. याआधी अमेरिकन ओपनमध्ये म्लाडेनोविकने तिला पहिल्या फेरीत तर विम्बल्डनमध्ये दुसऱया फेरीत पराभूत झाली होती. त्यानंतर टोरांटो व सिनसिनॅटी स्पर्धेत ती पहिल्याच फेरीत पराभूत झाली होती. म्लाडेनोविकने चीनच्या डुआन यिंगयिंगचा 6-2, 6-3 असा पराभव केला. माजी पेंच ओपन विजेत्या येलेना ओस्टापेन्कोने चीनच्याच यू झायाओडीवर 6-3, 0-6, 6-2 अशी मात करून शेवटच्या सोळांमध्ये स्थान मिळविले. तसेच फ्रान्सच्या फिओना फेरो व ऍलिझ कॉर्नेट यांनीही आगेकूच केली आहे.