|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » येत्या दोन दिवसात निर्णय जाहीर करणार : दीपकआबा सांळुखे

येत्या दोन दिवसात निर्णय जाहीर करणार : दीपकआबा सांळुखे 

  प्रतिनिधी / सांगोला

येत्या दोन दिवसात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष काय निर्णय घेतो हे पाहुनच पुढील राजकीय भुमिका स्पष्ट करणार असल्याची भूमिका माजी आम. दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी मांडली आहे. गेल्या दोन दिवसापुर्वी त्यांनी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

संपुर्ण महाराष्ट्राची राजकीय उलथापालथ् मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. यामध्ये सोलापूर जिल्हासुध्दा मागे राहीला नाही. जिह्यातील अनेक मातब्बर नेतेमंडळींनी भाजप सेनेचा आश्रय घेतला आहे. गेल्या दोन दिवसापुर्वी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला आहे. परंतु त्यांनी अद्याप राष्ट्रवादी सोडली नाही. त्यावर बोलताना दीपकआबा यांनी पुढील दोन दिवसात पक्ष काय भुमिका घेणार त्यावरच आपला निर्णय अवलंबून असल्याचे सांगितले.

सांगोला विधानसभेसाठी अनेक तर्कवितर्क काढले जात असतानाच दीपकआबांचा राजीनामा बरेच काही सांगून जातो. विद्यमान आमदार गणपतराव देशमुख विधानसभेची निवडणूक न लढविण्यावर सध्यातरी ठाम आहेत. त्यामुळे ते कोणाचे नाव पुढे करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. गेल्या कित्येक निवडणुकांमध्ये दीपकआबांनी त्यांना मदत केली आहे. त्याची परतफेड म्हणून त्यांनी दीपकआबांच्या उमेदवारीला पाठींबा द्यावा अशी अपेक्षा बाळगणे काही गैर नाही. परंतु जर का त्यांनी दुसऱया उमेदवाराचे नाव पुढे केले तर मात्र दीपकआबांचे राजकीय पुर्नवसन पक्ष कशाप्रकारे करणार हे महत्वाचे आहे. यावेळेस कसल्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढविण्यावर दीपकआबा मात्र ठाम आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून जर का तिकीट मिळणार नसेल तर आपल्याला सर्व पर्याय खुले आहेत अशीच भावना सध्यातरी त्यांची दिसत आहे. त्यामुळे पक्षाने याकडे गांभीर्याने बघावे याकरीताच त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात राष्ट्रवादी पक्ष कोणती भूमिका घेणार हे बघुनच पुढील राजकीय निर्णय घेवू असे त्यांनी सांगितले.

शिवसेनेच्या संपर्कात

  गेल्या कित्येक दिवसापासून माजी आम. दीपकआबा हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यांनी गेल्या दोन दिवसांपुर्वी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यामुळे दीपकआबांसाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या शिवबंधनाचा मुहुर्त कधी निघणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related posts: