|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » खाणी कधी सुरु करणार, हेच सरकारने सांगावे

खाणी कधी सुरु करणार, हेच सरकारने सांगावे 

प्रतिनिधी/ पणजी

गोव्यातील खाण व्यवसायासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारच्या परस्पर विरोधी धोरणामुळे गोव्यातील खाण अवलंबित प्रचंड नाराज बनले आहेत. यंदाच्या हंगामात खाणी सुरु होणार की नाही हे सरकारने आता स्पष्ट करावे, अशी मागणी होत  आहे. गोवा मायनिंग पिपल्स प्रंटनेही 13 सप्टेंबरनंतर पुन्हा आक्रमक होण्याची तयारी चालविली आहे. सरकारने नाटके बंद करुन खाणी कधी सुरु करणार तेवढेच सांगावे, अशी मागणी प्रंटचे नेते पुती गावकर यांनी केली आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे धोरण परस्पर विरोधी असल्याने आता गोव्यातील खाण अवलंबित बिथरले आहेत. सरकार लपवाछपवी करीत असल्याचा उघड आरोप केला जात आहे. नोव्हेंबरपर्यंत राज्यातील खाण व्यवसाय सुरु होणार असे सरकार व भाजपतर्फे सांगण्यात येत आहे तर केंद्रीय नेते व खाणमंत्री खाणींच्या लिलावाचे सल्ले देत आहेत. परिणामी सरकारचे खाणी संदर्भात नेमके धोरण काय हे स्पष्ट होत नाही. त्यामुळेच खाण अवलंबित बरेच बिथरले आहेत.

केवळ आश्वासनावरच होतेय बोळवण

मागील काही वर्षे खाणींबाबत केवळ आश्वासनेच मिळाली पण खाणी सुरु करण्यासाठी सरकारकडून कोणतेच ठोस प्रयत्न झाले नाहीत. प्रत्येक हंगामापूर्वी आश्वासने दिली गेली पण हंगाम कोरडेच गेले. त्यामुळे आता खाण अवलंबित बिथरले आहेत. यावेळी केवळ आश्वासनावरच बोळवण होणार नाही ना अशी भीती त्यांना वाटत आहे. भाजपच्या एकाही नेत्याने खाणीसंदर्भात आपला शब्द पाळलेला नाही. त्यामुळे सध्या सरकारच्या आश्वासनावरच खाण अवलंबितांना संशय आहे.

प्रंटची 13 सप्टेंबरनंतर ठोस भूमिका

मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी सबुरीचा सल्ला गोवा मायनिंग प्रंटला दिला आहे. त्यामुळे चतुर्थीपर्यंत प्रंटने कळ सोसली. आता 13 सप्टेंबरनंतर ठोस भूमिका घेण्याचा निर्णय प्रंटने घेतला आहे. थेट मुख्यमंत्र्यांच्या घरीच ठाण मांडले जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर खाण अवलंबितांसाठी महिन्याचा पगारही सरकारकडेच मागितला जाण्याची शक्यता आहे.

खाण व्यवसायासंदर्भात सरकारची खूप नाटकेः गावकर

सरकारने खाण व्यवसायासंदर्भात खूप नाटके केली. आता ही सर्व नाटके बंद करुन खाणी कधी सुरु करणार तेवढेच सरकारने सांगावे, असे गोवा मायनिंग प्रंटचे नेते पुती गावकर यांनी स्पष्ट केले आहे. हल्लीच झालेल्या बैठकीत प्रंटने हिच भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता सरकारने खाणी कधी सुरु करणार तेवढेच स्पष्टपणे सांगावे. 13 सप्टेंबरनंतर ठोस भूमिका प्रंट घेणार असल्याचेही ते म्हणाले.

Related posts: