|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आज अकरा दिवशीय गणेशमूर्तीचे विसर्जन

आज अकरा दिवशीय गणेशमूर्तीचे विसर्जन 

प्रतिनिधी/ पणजी

राज्यात आज गुरुवार दि. 12 सप्टेंबर रोजी 11 दिवशीय गणेशमूर्तीचे विसर्जन होणार असून ठिकठिकाणी अनंत चतुर्दशी उत्सवही साजरा केला जाणार आहे. राज्यातील बहुतेक सर्व शहरात तसेच तालुका ठिकाणी व प्रमुख गावात सार्वजनिक गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला असून त्याची आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने सांगता होणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सवातील गणेशमूर्तींचे आज विसर्जन केले जाणार असून त्यासाठी मिरवणुका निघणार आहेत.

  गोव्यात अनेक घरातून हा अनंत चतुर्दशी उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येतो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे देखील तो साजरा करतात. त्यानिमित्ताने विविध धार्मिक विधी होतात. तसेच सगेसोयरे व आप्तेष्ठांना बोलावून त्यांना उत्सवात सहभागी करून घेतले जाते. त्यावेळी कुटुंबातील सर्व माणसे एकत्र येतात आणि हा उत्सव साजरा करतात.

  या दिवशी सार्वजनिक गणेशमूर्तीचे गाजत गाजत विसर्जन विसर्जन होणार आहे. अकरा दिवसीय गणेशोत्सवात विविध सार्वजनिक मंडळातर्फे अनेक प्रकारचे करमणूक कार्यक्रम सादर केले. त्यात नाटके, भजने, कीर्तने, लोककला, गायन तसेच विविध प्रकारच्या स्पर्धा यांचा समावेश होता. अनेक मंडळांनी लॉटरी योजना राबवल्या आणि समाजपयोगी उपक्रमही साकारले. सार्वजनिक गणेशोत्सवात विविध विषयावर चांगले देखावे सादर करण्यात आले.

Related posts: