|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » देखावे पाहण्यासाठी शेवटच्या दिवशी तुफान गर्दी

देखावे पाहण्यासाठी शेवटच्या दिवशी तुफान गर्दी 

रात्री उशिरापर्यंत भाविकांचा उत्साह : ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी

बेळगाव / प्रतिनिधी

गणरायाचे आगमन होऊन नऊ दिवस झाले पण पावसाने उसंत न घेतल्याने नागरिकांना देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडणे शक्मय झाले नव्हते. परंतु बुधवारी शेवटच्या दिवशी पावसाने उसंत घेतल्यामुळे बेळगाव शहर व उपनगरांमध्ये देखावे पाहण्यासाठी तुफान गर्दी झाली होती. यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीच्या कोंडीचा सामना गणेशभक्तांना करावा लागला.

गणेशोत्सवात सादर करण्यात येणाऱया देखाव्यांचे आकर्षण सर्वच वयोगटातील भक्तांना असते. बेळगावमध्ये जिवंत देखावे सादर केले जात असल्याने या देखाव्यांना एक वेगळेच वलय प्राप्त झाले आहे. सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक उपदेश करणारे देखावे असतात. बुधवारी सायंकाळी 7 नंतर नागरिकांची रस्त्यांवर गर्दी दिसून येत होती. दुचाकी, चारचाकी, रिक्षांमधून गणेशभक्त देखावे पाहण्यासाठी बाहेर पडले होते.

एसपीएम रोड, नाथ पै चौक, धर्मवीर संभाजी चौक, टिळक चौक, गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, किर्लोस्कर रोड, अनगोळ नाका ते अनगोळपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या गर्दीतूनही वाट काढत गणेशभक्त देखावे पाहण्यासाठी गर्दी करत होते.

गणेशभक्तांना प्रसाद वाटप

काही मंडळांकडून गणेशभक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. यामुळे गणेशभक्तांना रात्री उशिरापर्यंत देखावे पाहणे शक्मय झाले. बुधवारी रात्री उशिरापर्यंत शहर परिसर गजबजला होता. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

Related posts: