|Monday, September 23, 2019
You are here: Home » leadingnews » बाप्पा मोरया… कसबा गणपतीची मिरवणूक थाटात निघाली

बाप्पा मोरया… कसबा गणपतीची मिरवणूक थाटात निघाली 

पुणे / प्रतिनिधी : 

दहा दिवस आपल्या लाडक्या गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणुकीला मंडई चौकामधून सुरुवात झाली आहे. मिरवणुकीत शिवसेनेच्या नेत्या आणि विधनसभेच्या उपसभापती निलम गोऱहे आणि पुणे महानगरपालिकेच्या महापौर मुक्ता टिळक यादेखील सहभागी झाल्या आहेत. यावेळी त्यांनी बाप्पाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

बाप्पाच्या या मिरवणूकीत मराठी कलाकार मंडळींनी ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाला मानवंदना दिली आहे. यामध्ये सौरभ गोखले, श्रुती मराठे, आस्ताद काळे आदी कलाकार सहभागी झाले आहेत. मिरवणूक मार्गावर राष्ट्रीय कला अकादमीने यंदाही सामाजिक संदेश देणारी रांगोळी साकारली आहे. पर्यावरण ऱहासाकडे रांगोळीतून लक्ष वेधण्यात आले आहे. बाप्पाचे विसर्जन निर्विघ्न व्हावे यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून, लाखो भाविक यामध्ये सहभागी झाले आहेत. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात बाप्पाला निरोप देण्यासाठी जमले आहेत.