|Thursday, February 27, 2020
You are here: Home » उद्योग » मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीस लवकरच नवीन शुल्क आकारणी : ट्राय

मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीस लवकरच नवीन शुल्क आकारणी : ट्राय 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी(एमएनपी) करण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क कमी करण्यात आले असून यात कोणताही ग्राहक आपला मूळ मोबाईल नंबर बदलून दुसऱया दूरसंचार कंपनीचा नंबर घेणार असल्यास त्या ग्राहकाला फक्त 5.74 रुपये खर्च येणार आहे. या अगोदर हे शुल्क 19 रुपयांपर्यंत होते. तरी नवीन दर 30 सप्टेंबरपासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती टेलिकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय)ने दिली आहे.

पोर्टेबिलिटीचे नियम

नवीन ट्रायच्या नियमानूसार आता एकाच सर्कलच्या अंतर्गत नंबर पोर्ट करता येणार आहे. यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. या अगोदर हा आठवडय़ाचा कालावधी लागत असे.

पोर्टेबिलिटीचे आवेदन काही कारणास्तव चुकीचे ठरल्यास ट्राय मोबाईल ऑपरेटरला 10 हजार रुपयापर्यंत दंड आकारणी करणार आहे. तर व्यावसायिक पोर्टिगही सोपे होणार असून एकाच्या कागदपत्रातून एकाचवेळी 100 मोबाईल नंबर पोर्ट करण्याची सुविधा मिळणार आहे. या अगोदर ही मर्यादा 50 मोबाईल नंबरवर होती.

दूरसंचार ऑपरेटरला प्रत्येक मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी व्यवहारासाठी वेगवेगळय़ा एजन्सीना पैसे द्यावे लागतात. परंतु नवीन नियमावलीनुसार दूरसंचार ऑपरेटरला प्रत्येक व्यवहारात बचत करता येणार आहे.

 

 

Related posts: