|Thursday, February 27, 2020
You are here: Home » उद्योग » शेअर बाजार घसरणीसह बंद

शेअर बाजार घसरणीसह बंद 

वृत्तसंस्था /मुंबई :

सप्ताहातील चढउताराचा प्रवास कायम राहिल्याचे चित्र गुरुवारीही पहावयास मिळाले आहे. यामध्ये मुंबई शेअर बाजारात (बीएसई) दिवसअखेर सेन्सेक्स 166.54 अंकानी घसरण होत, 37,104.28 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) दिवसअखेर निफ्टी 54.60 अंकानी घसरण होत 10,981.05 वर बंद झाला आहे. ऐन सणसुदीच्या काळात अनेक गुंतवणूकदार  योग्य ठिकाणी  गुंतवणूक करण्यासाठी धडपडत करत असतात, परंतु बाजाराचा कल अस्थिर असल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण राहिले आहे.

दिवसभरातील व्यवहारात बँकिंग आणि वाहन क्षेत्रातील कामगिरी निराशजनक राहिल्याने घसरणीची नोंद करण्यात आली आहे. सेन्सेक्सने 37,435.15 इतकी सर्वाधिक उच्चाकी पातळी गाठली तर 37,048.67 हा निचांकी स्तर नोंदवला आहे. बीएसईमधील आठ कंपन्यांचे समभाग तेजीत राहिले अन्य 22 कंपन्यांचे समभाग मात्र घसरण होत बंद झाले आहेत. एनएसईमधील 15 कंपन्यांचे समभाग ांमध्ये लिलाव झाला तर 35 कंपन्यांमधील समभागांची विक्री झाली.

कामगिरीची नोंद

दिग्गज कंपन्यांमध्ये आयसीआयसीआय बँक सर्वाधिक म्हणजे 2.13 टक्क्यांनी तेजीत राहिली. अन्य कंपन्यांत सन फार्मा          1.34, इंडसइंड बँक 1.26, एचडीएफसी बँक 0.95 आणि एचडीएफसीचे समभाग 0.54 टक्क्यांनी तेजीत राहिले.

या उलट बँकेचे समभागाची 5.10 टक्क्यांनी सर्वाधिक पडझड होत यासोबतच टाटा मोटर्स डीव्हीआर 4.87, टाटा मोटर्स 4.76, मारुती सुझुकी3.13, ऍक्सिस बँक 2.74 यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.

 

 

Related posts: