|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सुखासाठी दशलक्षण सोहळय़ात सहभागी व्हावे

सुखासाठी दशलक्षण सोहळय़ात सहभागी व्हावे 

वार्ताहर /कारदगा :

आज आपण जीवन जगत असताना सुखाच्या पाठीमागे लागलो आहोत. पण आपण ज्या सुखाच्या मागे लागतो त्याच्या मागे दुःख फार असते. खऱया सुखाची ओळख करून घ्यायची असेल तर दशलक्षण पर्वसारख्या सोहळय़ात सहभागी होऊन भगवंताचे नामस्मरण करावे, असे मत अरिहंत सौहार्द शाखेचे व्यवस्थापक अनिल पाटील यांनी व्यक्त केले. येथे दशलक्षण महापर्व सोहळय़ानिमित्त आयोजित पुष्पमालेत 9 व्या दिवशी तीन अक्षरांचा संसार या विषयावर ते बोलत होते. यावेळी प्रसंगसागर महाराजांनीही आशीर्वचन केले.

आक्काताई धरणगुत्ते, विजुताई खिचडे, पद्मश्री मायगोंड, उज्ज्वला आळते, कांचन पट्टणकुडे यांच्या हस्ते प्रतिमा अनावरण तर भाऊसाब माणगावे, राजू भागाजे, संजू कासार, अभय उपाध्ये, रावसो भागाजे, जिन्नाप्पा माणगावे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक रुपाली भागाजे यांनी केले. पाहुण्यांची ओळख अभय उपाध्ये यांनी करून दिली. तर अतिथींचा सत्कार बंडा हुद्दार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्रावक-श्राविका उपस्थित होत्या. संदेश आळते यांनी आभार मानले.