|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेळवीत शेतकऱयाची गळफासाने आत्महत्या

बेळवीत शेतकऱयाची गळफासाने आत्महत्या 

वार्ताहर /  हुक्केरी :

बेळवी (ता. हुक्केरी) येथील शेतकरी केंपण्णा मल्लाप्पा नाईक (वय 65) यांनी कर्जाची परतफेड न झाल्याच्या नैराश्येतून आपल्या शेतवातीतील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. केंपण्णा नाईक यांनी बेळवी प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संस्थेत 2 लाख रुपये, महालक्ष्मी सहकारी सोसायटीत 1 लाख रुपये असे कर्ज घेतले होते. चार एकर जमिनीत सोयाबिन, जोंधळा केला होता. मात्र या पिकांचे पावसामुळे नुकसान झाले. परिणामी कर्जाची परतफेड कशी करावयाची या नैराश्येतून त्यांनी शेतातील झाडाला गळफास घेत आपले जीवन संपविले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे. सदर घटनेची नोंद हुक्केरी पोलीस स्थानकात झाली आहे.

Related posts: