|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हुक्केरी तालुक्यात पूरग्रस्तांसाठी 4 कोटी 62 लाख मंजूर

हुक्केरी तालुक्यात पूरग्रस्तांसाठी 4 कोटी 62 लाख मंजूर 

वार्ताहर /  हुक्केरी :

गेल्या महिन्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी सरकारच्यावतीने पहिला हप्ता म्हणून 4 कोटी 62 लाख रुपये अनुदान आले आहे, अशी माहिती तहसीलदार रेश्मा ताळीकोटी यांनी दिली.

ताळीकोटी पुढे म्हणाल्या, आतापर्यंत 4 कोटी 35 लाख रुपये पूरग्रस्तांना देण्यात आले आहेत. तसेच तालुक्यात एकूण 2917 घरांच्या भिंती पडल्या असून यामध्ये 377 संपूर्ण घरे तर 1052 घरांच्या दोन भिंती व उर्वरित 1487 घरांची एक भिंत पडली आहे. या संदर्भात स्थानिक अभियंते सर्व्हे करुन आपल्याला व जिल्हा पातळीवरील अधिकाऱयांना अहवाल सादर करत आहेत. आतापर्यंत 4163 जणांना 10 हजार रुपयाचे धनादेश देण्यात आले आहेत. यामध्ये 600 जणांना धनादेशद्वारा तर उर्वरितांना आरटीजीएस मार्फत वितरण करण्यात आले आहे.

सध्या संपूर्ण तालुक्यात पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचा तज्ञांकडून सर्व्हे सुरू आहे. यामध्ये 60 टक्के सर्व्हे झाला असून उर्वरित 40 टक्के सर्व्हे सुरू आहे. तो सर्व्हे पूर्ण झाल्यावर संपूर्ण माहिती वरिष्ठांना पाठविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

अधिकाऱयांकडून सर्व्हे व उलट तपासणी

सर्व्हे करण्यात आला असला तरी पण सरकारने तिसऱया व्यक्तीकडून उलट तपासणी सुरू केली आहे. नुकतेच तालुक्यातील मदिहळ्ळी, कोटबागी व इतर गावात काडा खात्याचे उपविभागीय अधिकारी शिंत्रे यांनी उलट तपासणी करुन आपला अहवाल जिल्हाधिकारी व संबधित अधिकाऱयांना पाठविला आहे.

Related posts: