|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » संकेश्वरच्या डॉक्टरसह सहा ठार

संकेश्वरच्या डॉक्टरसह सहा ठार 

प्रतिनिधी /  संकेश्वर :

मुंबईचा राजा लालबागचे दर्शन घेऊन परतणाऱया भाविकांच्या आराम बसला सातारानजीक अपघात होऊन सहा ठार तर 20 जखमी झाले. मृतांमध्ये हुक्केरी तालुक्यातील तिघांचा समावेश आहे. संकेश्वर येथील डॉ. सचिन शंकरगोंडा पाटील (वय 35) व विश्वनाथ उर्फ राजू विरुपाक्षी गड्डी (वय 58) आणि मोदगा येथील गुंडू तुकाराम गावडे (वय 40) यांचा समावेश आहे. याबरोबरच बसवराज व्ही. बागलकोटी (वय 55 रा. संकेश्वर) हे गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेने शहरावर शोककळा पसरली असून येथील सार्वजनिक गणेश मंडळांकडून दुपारीच श्रीमूर्तींचे विसर्जन साधेपणाने करण्यात आले. याबरोबरच नवसाला पावणाऱया निलगार गणपतीचे दर्शन गुरुवारी बंद ठेवण्यात आले होते.

हुक्केरी तालुक्यातील तिघांसह अब्बास अली (वय 42, अनगोळ), अशोक रामचंद्र जुनघरे ( वय 50, रा. दिवदेव वाडी, ता. जावली) व अन्य एक अशा सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सुमेधा तीरवार ( वय 22), राजश्री जयदीप पाटील ( वय 23), जयदीप रामचंद्र पाटील ( वय 30, सर्व रा. बेळगाव) यांच्यासह 12 जण जखमी झाले आहेत. बसमधून एकूण 30 प्रवासी प्रवास करत होते. यावेळी दोन चालक व क्लिनर ही गाडीत होते.

मुंबईहून एसआरएस कंपनीची खासगी आराम बस बेळगावकडे प्रवासी घेऊन येत होती. साताऱयानजीक आल्यावर येथील डीमार्टसमोर समोर टायर बस्ट झाल्याने दुभाजकाला धडकलेल्या ट्रकला भरधाव बसची ट्रकला मागून जोराची धडक बसली. धडक इतकी जोरदार होती की बसच्या उजव्या बाजूकडील सीटवर बसलेले सहा प्रवासी जागीच ठार झाले. यात संकेश्वरमधील डॉ. सचिन आणि विश्वनाथ यांचा समावेश आहे. तसेच अपघातात अन्य 17 प्रवासी जखमी झाले आहेत. तर जोरदार धडकेने आराम बसच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच सातारा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हंकारे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महामार्ग देखभाल विभाग कर्मचारी यांच्या मदतीने जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात आले. यानंतर जखमींना साताऱयाच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सेवा काहीकाळ कोलमडली होती. बसवराज बागलकोटी हे जखमी झाले असून त्यांच्यावर साताऱयाच्या यशवंत हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

Related posts: