|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » संकेश्वर येथे श्रीमूर्तीचे विसर्जन

संकेश्वर येथे श्रीमूर्तीचे विसर्जन 

 प्रतिनिधी /संकेश्वर :

मंगलमूर्ती मोरय्या।़।़।़ गणपती।़।़।़ बाप्पा मोरय्या, पुढच्या वर्षी लवकर या।़।़।़ च्या जयघोषात गुरुवारी सकाळी 11 वाजता सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यंदा गांधी चौक गणेश उत्सव मंडळाने सर्वप्रथम मूर्ती विसर्जन केली. गेल्या अकरा दिवसापासून संकेश्वर नगरीत 38 गणेश उत्सव मंडळानी श्री मूर्तीची प्रतिष्ठापणा करुन विधीवत पूजाअर्चा केली. गुरुवारी  सकाळपासूनच विसर्जन मिरवणुकीच्या तयारीची लगबग सुरू झाली होती. विसर्जन मिरवणुकीचा उत्साह प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांत होता पण सकाळी अचानक साताऱयाच्या अपघातात डॉ. सचिन पाटील व राजू गड्डी यांच्या निधनाचे वृत्त शहरात पसरताच प्रमुख नेते आणि पोलिसांनी संयुक्तपणे मूर्ती विसर्जन दुपारपूर्वीच उरकून घेण्याचा निर्णय घेतला व त्याप्रमाणे सकाळी 11 वाजल्यापासून बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. दुपारी 3 वाजेपर्यंत सर्वच मंडळाच्या मूर्तींचे हिरण्यकेशीत विसर्जन करण्यात आले.