|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भाजपचे शंभर दिवस अपयशाचेच

भाजपचे शंभर दिवस अपयशाचेच 

प्रतिनिधी   / मडगाव :

केंद्रात भाजपचे दुसऱयांदा सरकार सत्तेवर आले. या सरकारला शंभर दिवस पूर्ण झाले. या शंभर दिवसात या सरकारने खूप काही साध्य केल्याचा दावा भाजप करीत आहे. पण, हा दावा चुकीचा असून केंद्रातील भाजप सरकारचे शंभर दिवस हे अपयशाचेच होते अशी टीका दक्षिण गोव्याचे खा. फ्रान्सिस सार्दिन यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

देशाची अर्थ व्यवस्था कोलमडली आहे. विदेशी चलनाच्या तुलनेत भारतीय रूपयांची घसरण झाल्याचा दावा त्यांनी केला. त्याच बरोबर सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) 5 टक्क्यावर पोचला आहे. मात्र, या सदंर्भात भाजप 8 टक्क्यांचा दावा करीत आहे. तो खोटा असल्याचे अर्थशास्त्रातील तज्ञ व्यक्ती सांगत आहे. त्यामुळे भाजप सरकारचे दुसऱया टर्ममधील शंभर दिवस हे अपयशाचेच होते अशी टीका त्यांनी केली.

भाजप सरकारने आपल्या पहिल्या टर्ममध्ये विमुद्री करण केले. त्या वेळी अनेक उद्योगांना फटका बसला, त्या फटक्यातून अद्याप उद्योग व्यवसाय सावरला नाही. बिस्किट उत्पादनात अग्रेसर असलेली पार्ले कंपनी बंद पडली. यावरून भाजप सरकारचा निर्णय किती घातक होता हे स्पष्ट होत असल्याचे खा. सार्दिन यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी डोळे उघडे करून बघावे

गोव्यातील प्रश्नावर बोलताना खा. सार्दिन यांनी गोव्यातील रस्ते खड्डेमय बनल्याने सरकारवर जोरदार टीका केली. हे रस्ते तातडीने दुरूस्त करावे अशी मागणी देखील त्यांनी केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात काय चालले आहे हे डोळे उघडे करून बघावे असा सल्लाही त्यांना दिला. पूर्वी काँग्रेस सरकारच्या राजवटीत पावसाळय़ात खड्डेमय रस्त्याची ‘कोल्ड मिक्स’ वापरून डागडूजी केली जायची. ही प्रक्रिया आत्ता बंद झालेली आहे. ती का बंद करण्यात आली याचे उत्तर सरकारने जनतेला द्यावे अशी मागणी त्यांनी केली.

जुवारी पुलाजवळ नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. गेल्या वर्षभरापासून ही समस्या कायम आहे. जर वाहतूक कोंडी सोडविण्यास, वाहतूक पोलिसांना जमत नसेल तर या ठिकाणी मिलिटरी आणून समस्या निकालात काढावी अशी मागणी देखील त्यांनी केली. जुवारी पुलावर वाहतुकीची कोंडी होत असल्याने अनेक वाहन चालक बोरी मार्गे फोंडय़ाला जात असतात. ही परिस्थिती का उद्भवली असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

Related posts: