|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा जलतरण संघटनेचे सचिव सय्यद अब्दुल माजीदचा राजिनामा

गोवा जलतरण संघटनेचे सचिव सय्यद अब्दुल माजीदचा राजिनामा 

क्रीडा प्रतिनिधी /मडगाव:

गोवा जलतरण संघटनेचे सचिव सय्यद अब्दुल मजीद यांनी संघटनेच्या सचिवपदाचा राजिनामा दिला आहे. राज्यातील जलतरण प्रशिक्षक सूरजित गांगुलीच्या कारनाम्यामुळे संपूर्ण देशात गोव्याचे आणि प्रामुख्याने गोवा जलतरण संघटनेचे नाव खराब झाले होते. ही घटना ताजी असतानाच अब्दुल मजीद यांनी राजिनामा दिल्याने क्रीडा क्षेत्रात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

एका 15 वर्षीय जलतरणपटूवर लैंगिक अत्याचार आणि कथित बलात्काराचा आरोप असलेल्या सूरजित गांगुलीचा एपिसोड ताजा असताना गोवा जलतरण संघटनेचे सचिव सय्यद अब्दुल मजीद यांच्या राजिनाम्यामुळे आता परत एकदा जलतरण संघटना काही प्रमाण चर्चेत आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सय्यद अब्दुल मजीदने संघटनेच्या सचिवपदाचा राजिनामा काही दिवसापूर्वीच दिला आहे. आपल्या राजिनाम्याची माहितीही मागील कार्यकारी मंडळात सदस्यपदी असलेल्या गोवा क्रिकेट संघटनेलाही दिला आहे. विशेष म्हणजे अब्दुल मजीद यांनी गोवा क्रिकेट संघटनेच्या 22 सप्टेंबर रोजी होणाऱया निवडणुकीसाठी संयुक्त सचिवपदासाठी अर्ज दाखल केला आहे.

लोढा आयोगाच्या निर्देशानूसार राज्य क्रिकेटनेच्या निवडणुका लढवायच्या असतील तर तो उमेदवार दोन क्रीडा संघटनेवर असता कामा नये. सय्यद अब्दुल मजीद यांनी गोवा जलतरण संघटनेपेक्षा गोवा क्रिकेट संघटनेला पसंती दिली असून जलतरण संघटनेचा राजिनामा दिला आहे. सध्या गोवा जलतरण संघटना संकटात आहे आणि पालकांसमोर आपल्या पाल्यांच्या संरक्षणाचा यक्ष प्रश्न समोर ठोकला आह. असं असताना सुद्धा रणांगणातून पळ काढणाऱया गोवा जलतरण संघटनेचे सचिव सय्यद अब्दुल मजीद यांचा निर्णय सर्वांना कोंडीत टाकणार असल्याचे मत काही माजी जलतरणपटूंनी तसेच पालकांनी केले आहे.