|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » रस्ते दुरुस्त करा, अन्यथा आंदोलन छेडू

रस्ते दुरुस्त करा, अन्यथा आंदोलन छेडू 

प्रतिनिधी /मडगाव :

राज्यातील 40 ही मतदारसंघातील रस्ते खराब झाले आहेत. खड्डेमय रस्त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. सद्या पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. हीच संधी साधून हे रस्ते युद्ध पातळीवर दुरूस्त करण्याचे काम सरकारने हाती घ्यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काल गुरुवारी मडगावात केली. मडगाव मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गाचे दुरूस्तीकाम हाती न घेतल्यास आज शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

मडगाव शहरातील बहुतेक सर्वच रस्ते खराब झालेले आहेत. डांबर नावाचा प्रकारच या ठिकाणी शिल्लक राहिलेला नाही. त्यात पावसाने विश्रांती घेतल्याने, या रस्त्यावरून वाहने गेली की, धुळ सर्वत्र पसरते. त्याची पाहणी काल गुरूवारी संध्याकाळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी उदय प्रभुदेसाई, दक्षिण गोव्याचे पोलीस उपअधीक्षक अरविंद गांवस, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंते लक्ष्मीकांत नाईक, पोलीस उपअधीक्षक राजू राऊत देसाई, वाहतूक पोलीस उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर, नगरसेवक दामोदर नाईक, माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो, माजी नगरसेवक दामोदर शिरोडकर, न्यू मार्केट ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शिरोडकर, माजी नगरसेविका श्रीमती झरीना शहा, डॉ. व्ही. व्ही. कामत व स्थानिक व्यापारी उपस्थित होते.a

Related posts: