|Monday, September 23, 2019
You are here: Home » leadingnews » आज होणार ‘फुल हार्वेस्ट मून’चे दर्शन

आज होणार ‘फुल हार्वेस्ट मून’चे दर्शन 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

आज ‘फुल हार्वेस्ट मून’ दिसणार आहे. नेहमी चंद्रोदय सूर्यास्तानंतर 50 मिनिटांनी होतो. आज मात्र, चंद्रोदय सूर्यास्तानंतर पाच मिनिटांनी होणार आहे. तेरा वर्षानंतर हा योग जूळून आला आहे. हा चंद्र लोकांनाही पाहता येणार आहे, नासाच्या शास्त्रज्ञांनी याबाबतची माहिती दिली आहे.

आजचा चंद्र नेहमीच्या पूर्ण चंद्रापेक्षा छोटा दिसेल. कारण आजचा चंद्र त्याच्या कक्षेच्या दूरच्या टोकाला असणार आहे. यामुळे आजचा चंद्र माइक्रो मून आणि सुपर मूनच्या तुलनेत 14 टक्के लहान आणि 30 टक्के कमी प्रकाशित दिसणार आहे. चंद्र पृथ्वीपासून 251,655 मैल दूर असणार आहे. आज उगवणारा चंद्र नेहमीपेक्षा आगोदर प्रकाश पसरवतो आणि तो नेहमीच्या पूर्ण चंद्रापेक्षा लहान असतो.

अमेरिकेच्या संस्कृतीमध्ये फुल हार्वेस्‍ì मूनला अशुभ मानले जाते. अमेरिकेच्या इतिहासात आजचा दिवस सर्वाधिक भयानक मानला जातो. यामुळे अनेक लोक या दिवशी व्यवहार आणि प्रवास करणे टाळतात. त्यामुळे अमेरिकेला काही डॉलरमध्ये तोटा सहन करावा लागणार आहे.