|Monday, September 23, 2019
You are here: Home » leadingnews » मुख्यमंत्रीच तयार करतील शिवसेनेची यादी : उद्धव ठाकरे

मुख्यमंत्रीच तयार करतील शिवसेनेची यादी : उद्धव ठाकरे 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

यंदा शिवसेनेची यादी तुम्हीच तयार करा असं मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. त्यांच्याकडून एकदा यादी आली की आम्ही आमच्या नेत्यांसमोर ठेवू आणि त्यावर निर्णय घेऊ अशी टोलेबाजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज, शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केली.

भाजप-शिवसेना युतीबाबत सर्वत्र चर्चा चालू आहेत. या चर्चेबद्दल विचारले असता उद्धव ठाकरे यांनी मार्मिक उत्तर दिले. ते म्हणाले, बोलणी अंतिम टप्प्यात आली आहेत. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच शिवसेनेची यादीही तयार करायला सांगितली आहे.

उद्धव यांच्या या विधनाचे दोन अर्थ काढले जाऊ शकतात. भाजपा-शिवसेनेत सगळं अगदी सामोपचाराने सुरू आहे, असं भासवण्याचा त्यांचा हा प्रयत्न असू शकतो. मात्र त्याचवेळी मोठय़ा ‘भावा’च्या नावाखाली भाजपा नेते त्यांना हवं तेच शिवसेनेवर थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत, म्हणून मग त्यांनाच यादी करायला सांगितली, असा ही दुसरा अर्थ निघू शकतो. यातला कोणता अर्थ योग्य आहे ते येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.