|Saturday, December 14, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » दहशतवाद्यांवर पाकिस्तानकडून उधळपट्टी

दहशतवाद्यांवर पाकिस्तानकडून उधळपट्टी 

प्रशिक्षणासाठी 7 लाख कोटी रुपये खर्च : पंतप्रधान इम्रान खान यांचीच कबुली

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

पाकिस्तान सरकारकडून दहशतवादी संघटनांकडून मोठय़ा प्रमाणात आर्थिक रसद पुरविली जात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याच्या वक्तव्यातून याला दुजोरा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानने दहशतवादी संघटनांवर सात लाख कोटी रुपये इतका अवाढव्य खर्च केल्याची कबुलीच त्यांनी दिली आहे.

दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनसह बऱयाच संघटनांना बळ देण्यासाठी पाकिस्तान सरकारकडून आर्थिक मदत पुरविली जाते. या मदतीचा वापर दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी केला जात आहे. गेल्या काही दिवसात  पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेतील 100 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच तब्बल सात लाख कोटी रुपयांचा खर्च केला असल्याचा गौप्यस्फोट खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. गुरुवारी पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी दहशतवादी पाकिस्तान सरकारच्या इशाऱयावर काम करत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीच दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणासंबंधी वक्तव्य केल्याने सरकारच्या छुप्या पाठिंब्याचा पर्दाफाश झाला आहे.

पाकिस्तानचे गृहमंत्री एजाज अहमद शाह यांनी दोन दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानने जमात-उल-दावावर अब्जावधी रुपयांचा खर्च केल्याचे म्हटले होते. तसेच दहशतवादी संघटनांना मुख्य प्रवाहात आणण्याचा सरकारचा प्रयत्न असून दहशतवाद्यांना नोकरी आणि पैसे पुरवण्याची जबाबदारी सरकारने घ्यायलाच हवी असेही ते पुढे म्हणाले होते. त्यापाठोपाठ आता दस्तुरखुद्द पंतप्रधान इम्रान खान यांनीच आणखी एक मोठी कबुली देत सर्वांनाच धक्का दिला. गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तानने 70 हजार लोकांना गमावले असून देशाच्या अर्थव्यवस्थेतील सात लाख कोटी रुपये गमावल्याची स्पष्टोक्ती त्यांनी दिली. एवढे लोक आणि पैसा गमावल्यानंतरही अमेरिकेने आमच्यावरच अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला. पाकिस्तानच्या विरोधात झालेला हा अन्याय आहे,’’ असेही इम्रान खान म्हणाले.

अमेरिकेवर आगपाखड

80 च्या दशकात सोव्हिएत संघाने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता. त्यावेळी आम्ही मुजाहिद्दिन लोकांना त्यांच्याविरोधात जिहादाचे प्रशिक्षण देत होतो. त्यांना पाकिस्ताननेच प्रशिक्षित केले आहे. त्यांच्यासाठी अमेरिकेच्या ‘सीआयए’कडून पैसा पुरवला जात होता, असे धक्कादायक वक्तव्यही इम्रान खान यांनी केले आहे. आता एका दशकानंतर अमेरिका अफगाणिस्तानमध्ये दाखल झाला आहे आणि त्याच जिहादींना आता अमेरिकेने दहशतवादी म्हणण्यास सुरुवात केली आहे,’’ असेही ते म्हणाले.

Related posts: