|Monday, September 23, 2019
You are here: Home » उद्योग » जीएसटी बैठकीत वाहन-एफएमसीजी दरात कपात शक्य

जीएसटी बैठकीत वाहन-एफएमसीजी दरात कपात शक्य 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेची बैठक 20 सप्टेंबर रोजी   होणार आहे. यामध्ये स्लॅब मध्ये फेरबदल करण्यासोबतच वाहन, बिस्किट आणि अन्य दैनंदिन वापरातील वस्तूंवर आकारण्यात येणारे कर कमी होण्याची शक्यता
तज्ञांनी व्यक्त केली आहे. आर्थिक विकासदर (जीडीपी) मध्ये आलेली घट कमी करण्यासाठी व नव्याने सुधारणा होण्यासाठी जीएसटीच्या रचनेत  बदल करण्याची योजना तयार करण्यात येणार त्यासाठी काही प्रस्तावही मागवण्यात आले असल्याची माहिती सरकारी अधिकाऱयांनी दिली आहे.

राज्य आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱयांच्या मागील बैठकीत वाहन क्षेत्रातील जीएसटी दर कमी करण्यावर चर्चा संभाव्य चर्चा केली होती. परंतु त्यावर कोणताही ठोस निर्णय झाला नाही. चालू बैठकीत मात्र वाहन क्षेत्रातील प्रवासी व अन्य वाहनांवरील जीएसटी  28 वरुन  18 टक्क्यावर करण्यासाठी मागणी करण्यात येणार आहे. जीएसटीसह अन्य अधिभार कर 1 ते 22 टक्के भरावा लागतो. रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी हायब्रिड आणि अन्य वाहनांवरील जीएसटी कपात करण्यासाठी घोषणा केली आहे. त्यामुळे नेमका कोणता बदल जीएसटीत होणार ते पहाणेच योग्य ठरणार आहे.