|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » उद्योग » कादा निर्यात मूल्य 850 डॉलर प्रतिटन निश्चित

कादा निर्यात मूल्य 850 डॉलर प्रतिटन निश्चित 

नवी दिल्ली

  वाढत जाणारी कांदय़ाच्या किंमतीवर मर्यादा लावण्यासाठी सरकारने निर्यात होणाऱया कांदय़ावर किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. ही किमत प्रति टन 850 डॉलर इतकी ठेवण्यात आली आहे. यामुळे वाढत जाणारे कांदा निर्यातीच्या प्रमाणात काही प्रमाणात मर्यादा येण्याची शक्यता सरकारने व्यक्त केली आहे. देशातील बाजारात कांदय़ाचे उत्पादन वाढल्यामुळे किंमतीत काही प्रमाणात घट होण्याचे संकेत बाजारातील तज्ञांनी मांडले आहेत. राजधानीच्या ठिकाणी मागील काही दिवसात कांदा किंमत वाढत जात 40 ते50 रुपये प्रति किलो झाली होती. यांच्या अगोदर हा दर 20 ते 30 रुपये किलो दर राहिला होता. परंतु सध्या निर्यात करण्याचे मूल्य निश्चित केले असून आगामी अधिसूचना लागू करेपर्यंत 850 डॉलर प्रति टनास दर राहणार असल्याचे विदेश व्यापार महासंचालनालय यांनी सांगितले आहे.

Related posts: