|Thursday, February 27, 2020
You are here: Home » उद्योग » डाटा म्हणजे तेल नाही : फेसबुकचे उत्तर

डाटा म्हणजे तेल नाही : फेसबुकचे उत्तर 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील सर्वाधिक श्रीमंत व यशस्वी उद्योगपती म्हणून मुकेश अंबानी यांना ओळखले जाते. त्यांनी वैयक्तिक माहिती साठवूण्याची तुलना तेल साठवण्यासोबत केल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. त्यावर उत्तर देताना डाटा म्हणजे कोणतेही तेल नाही. कि ज्याचा साठा कोणत्याही ठिकाणी केला जाते का? असे फेसबुकचे ग्लोबल अफेअर्स ऍण्ड कम्युनिकेशनचे उपाध्यक्ष निक क्लेग म्हटले आहे.

भारतीय ग्राहकांचा डाटा ग्लोबल कॉर्पोरेशनकडून अधिकारात ठेवण्याऐवजी त्याचा देशातंर्गत साठा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यास सागण्यात येते. परंतु तेलाचे भांडार साठवल्यास त्याचा देशाच्या आर्थिक समृद्धीस लाभ होतो. परंतु डाटा तसा ठेवल्यावर त्याचा लाभ होत नसल्याचे फेसबुकने स्पष्ट केले आहे.

डाटा हा मुक्त प्रवाहच

लोकांची वैयक्तिक माहिती ही कोणच्याही एकाधिकारात, व्यापारात, जमीनमधून बाहेर काढून कारखान्यात उत्पादन करण्यास घेऊन जाता येत नाही. कारण डाटा  हा विशाल समुद्रासारखा असतो. त्याला कोणतेही स्थान मर्यादा यामध्ये मोजता येत नाही. त्यामुळे उपलब्ध असणाऱया वस्तूसोबत डाटाचे मूल्य करणे कठिण असून त्यांची सुरक्षा महत्वाची असल्याचे निक यांनी म्हटले आहे.

ग्लोबल इंटरनेट आणि भारत

भारत आगामी काळात ग्लोबल इंटरनेट वापरात झेप घेणार असून भारताला इंटरनेटसाठी नवीन टेम्लेट उभारण्याची गरज असून त्यांची निवड ही लोकांच्या मागणीतून उभा करण्याची गरज आहे.

Related posts: