|Thursday, February 27, 2020
You are here: Home » उद्योग » पहिला 64 एमपी कॅमेऱयाचा स्मार्टफोन सादर

पहिला 64 एमपी कॅमेऱयाचा स्मार्टफोन सादर 

सुरुवातीची किंमत 15,999 रु :  रेलमी एक्सटी लाँच

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

चीनमधील कंपनी रेलमीने शुक्रवारी आपला अत्याधुनिक सुविधा असणारा रेलमी स्मार्टफोन एक्सटी भारतीय बाजारात दाखल केला आहे. फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप असून देशातील पहिला 64 मेगापिक्सल चा सेंसर कॅमेरा असणारा स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. एक्सटी फोन रॅम-स्टोरेजसोबत तीन मॉडेलमध्ये सादर केला असून  15,999 रुपयांपासून 18,999 रुपयांपर्यंत किंमती ठेवण्यात आल्या आहेत.

गेम खेळणाऱया ग्राहकांसाठी कंपनीने विशेष आवृत्ती रेलमी एक्सटी 730जी सादर केली आहे. स्नॅपड्रगन 730 प्रोसेस आणि 30 वॉट क्षमेचा चार्जर मिळणार आहे. परंतु यांचे सादरीकरण येत्या डिसेंबरमध्ये सादर करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

 विक्री 16 सप्टेंबरपासून

देशात सादर करण्यात आलेल्या नवीन स्मार्टफोनची विक्री 16 सप्टेंबरपासून सुरु करण्यात येणार आहे. यात फ्लिपकार्ट आणि रेलमी डॉट कॉम वरुनही यांची खरेदी शक्य आहे. स्मार्टफोन सोबत पॉवर बँक, वायरलेस बड्स आणि रेलमी प्रोटेक्टिव्ह केस ही उत्पादने सादर केली आहेत.

मॉडेल आणि केंमत

w 4 जीबी रॅम 64 जीबी स्टोरेज

    15,999 रु.

w 6 जीबी रॅम 64 जीबी स्टोरेज

    16,999 रु.

w 8 जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज

    18,999 रु.

फिचर्स

w डिस्प्ले 6.4 इंच

w
रेजोल्यूशन 1080ƒ2340

गोरिला ग्लास

ओएस-ऍड्राइंड

w प्रोसेस-ऑक्टा-कोर क्वालकॉम

w रॅम- 4 जीबी/6जीबी/8जीबी

w स्टोरेज-64जीबी/128

w रियर कॅमेरा-64एमपी 8एमपी 2 एमपी 2 एमपी

w फ्रन्ट कॅमेरा-16एमपी

w कनेक्टीव्हीटी-यूएसबी टाईप-सी पोर्ट,3.5 एमएम हेडफोन जॅक

w बॅटरी-4000 एमएएच फास्ट चार्ज,

Related posts: