|Thursday, February 27, 2020
You are here: Home » उद्योग » ‘फूड पार्क’साठी विश्व बँक देणार अर्थसहाय्य

‘फूड पार्क’साठी विश्व बँक देणार अर्थसहाय्य 

नवी दिल्ली

: देशभरात लहान आणि मोठे फूड पार्कची स्थापना करण्यासाठी विश्व बँक लवकरच 3,000 कोटी रुपयाचे अर्थसहाय्य करणार असल्याची घोषणा बँकेकडून करण्यात आल्याची माहिती सरकाने दिली आहे. या पार्कची उभारणी विशेष करुन पूर्वोत्तर क्षेत्रात होणार आहे. त्यामुळे शेतकऱयांना आपल्या उत्पादनाची क्षमता दोन पट करण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे केंद्रीय खाद्य राज्यमंत्री रामेश्वर तेली  यांनी शुक्रवारी सांगितले आहे. फूड पार्कला मदत करण्याची माहिती उत्तर भारत परिषद येथे आयोजित 15 वी भारत-अमेरिका आर्थिक संमेलनात करण्यात आली आहे. 

Related posts: