|Thursday, February 20, 2020
You are here: Home » उद्योग » बँका-तेल कंपन्यांच्या तेजीने बाजार सावरला

बँका-तेल कंपन्यांच्या तेजीने बाजार सावरला 

सेन्सेक्स 280 अंकानी वधारला : निफ्टी 11,075.90 वर बंद

वृत्तसंस्था/ मुंबई

सप्ताहातील शेवटच्या सत्रात मुंबई शेअर बाजार(बीएसई) तेजीसह बंद झाला आहे. शुक्रवारी बाजारात खासगी बँका आणि खनिज तेल कंपन्या यांच्या समभागानी समाधानकारक कामगिरीची नोंद केली आहे. बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 280 अंकानी वधारुन निर्देशांक 37,384.99 वर बंद झाला आहे. तर दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 93.10 अंकानी वधारत निर्देशांक 11,075.90 वर बंद झाला आहे.

मागील काही दिवसांमध्ये वाहन व अन्य क्षेत्रातील अलेल्या मरगळीचा परिणाम शेअर बाजारावर होत गेल्याचे पहावयास मिळाले आहे. त्यात जून तिमाहीचा दरात नोंदवलेली घट, वाहन विक्रीतील घसरते प्रमाण आणि गुरुवारी सादर झालेली किरकोळ महागाई दरातील वाढ आदीचा गोष्टीचा प्रभाव गुंतवणूकदारांवर होत असल्याचे दिसत आहे. परंतु येत्या काळात यात सुधारणा होत जाणार असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

दिवसभरातील व्यवहारात शुक्रवारी सेन्सेक्स 37,413.50 चा उच्चांक नोंदवला असून 37,000.09 इतका निच्चाकी स्तर गाठल्याचे दिसून आले आहे. बीएसईमधील 25 कंपन्याचे समभाग तेजीत राहिले व पाच कंपन्याचे समभागांची घरसण होत बंद झालेत. दुसऱया बाजूला एनएसईमधील 41 कंपन्यांमध्ये समभागाचा लिलाव करण्यात आल्याची नोंद केली.

दिग्गज कंपन्यांमध्ये वेदान्ताचे समभाग 2.27, आयसीआयसीआय बँक 2.61, ओएनजीसी 2.34, कोटक महिंद्रा       बँक 1.79 आणि टाटा मोटर्स डीव्हीआरचे समभाग 1.79 टक्क्यांनी तेजी नोंदवली. भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग नुकसानीत राहले.

Related posts: