|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » 33 लाखाच्या ऐवजासह 4 चोरटे अटकेत

33 लाखाच्या ऐवजासह 4 चोरटे अटकेत 

रेल्वे स्टेशन येथून घेतले ताब्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची करावाई

प्रतिनिधी/ रत्नागिरी

 जिह्यातील रेल्वेस्टेशन व बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेवून दागिन्यांची चोरी करणाऱया दोन महिलांसह 4 चोरटय़ांना पोलिसांनी अटक केल़ी  त्यांच्याकडून 33 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आह़े यामध्ये 26 मंगळसुत्र, 11 सोन्याचे हार, 25 अंगठय़ा, नथ, ब्रेसलेट, मनगटी घडय़ाळे आदींचा समावेश आह़े

    शिवा रामा साखरे (35), ज्योती शिवा साखरे (25)  अंजू उर्फ पद्मा शिवा शेट्टी (33, तिघेही ऱा मंगलूर पीर, ज़ि वाशिम) व विजय नरेश उर्फ राहूल धारी (21, ऱा मुकूंदवाडी, औरंगाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या चोरटय़ांची नावे आहेत़ याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह़े चौकशी दरम्यान खेड, रत्नागिरी शहर, देवरूख चिपळून पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये विविध ठिकाणी चारी केल्याची कबुली संशयितांकडून देण्यात आली आह़े

    गणपती सणादरम्यान रत्नागिरी जिह्यातील विविध रेल्वेस्टेशन व बसस्थानक परिसर गर्दीन फुलून गेली होत़ी या गर्दीचा फायदा उठवत प्रवाशांच्या दागिन्यांच्या चोरीच्या घटना समोर येत होत्य़ा या घटनांची गंभीर दखल घेवून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस निरिक्षक शिरीष सासने यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले होत़े त्यानुसार विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व गर्दीच्या परिसरात साध्या वेशातील पोलिसांकडून गस्त घालण्यात येत होत़ी

     दरम्यान गुरूवारी रत्नागिरी रेल्वेस्टेशच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर संशयित आरोपी संशयास्पद हालचाली करताना आढळले. यावेळी साध्या गणवेशातील पोलिसांनी चौकशी केली असता या चौघांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल़ी पोलिसांकडून दोन पंचासमक्ष त्याच्या बॅगची तपासणी केली असता दागिन्यांचे घबाड दिसून आल़े यामध्ये 26 मंगळसुत्र, 11 सोन्याचे हार, 9 चैन, 34 कानातील जोड, 6 कानातील चैन जोड, 25 अंगठय़ां, 7 सोन्याची पाने, 2 गंथनीमधील वाटय़ा, 1 बेसलेट, 19 नथ असा मिळून 29 लाख 85 हजार 848  सोन्याचे दागिने, 7 हजार 920 रूपयांचे चांदीचे दागिने, 6 मनगटी घडय़ाळे, 2 लाख 50 हजाराची रोकड तसेच लोखंडी कटर असा मिळून 32 लाख 60 हजार 368 किमतीचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत करण्यात आला आह़े

     सदरची कारवाई पोलीस अधीक्षक ड़ॉ प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वषण शाखेचे पोलीस निरिक्षक शिरीष सासने, रत्नागिरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक अनिल लाड, सहाय्यक पोलीस फौजदार तानाजी मोरे, सुभाष माने, पांडूरंग गोरे, हेड कॉन्स्टेबल संदीप कोळंबेकर, संजय कांबळे, शांताराम झोरे, राकेश बागुल, मिलिंद कदम, सुभाष भागणे, संजय जाधव, राजेंद्र भुजबळराव, स्नेहल मयेकर, अपूर्वा बापट, विद्या लांबोरे, नितीन डोमणे, पोलीस नाईक विजय आंबेकर, अरूण चाळके, सागर साळवी, रमीज शेख, अमोल भोसले, उत्तम सासवे, गुरू महाडीक, दत्ता कांबळे, संदीप मालप, वैदेही कदम, मधुरा गावडे, सांची सावंत, विकास चव्हाण, नितीन जाधव, रोशन सुर्वे, नंदकुमार सावंत यांनी केल़ी पंच म्हणून कृषी कार्यालयातील केरबा मारूती सालेगावे व सामाजिक कार्यकर्त्या मंगला जयदत्त नाईक यांनी सहकार्य केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आह़े

Related posts: