|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » किरडुवेत विहीरीत बुडून दोघांचा मृत्यू

किरडुवेत विहीरीत बुडून दोघांचा मृत्यू 

एकाला वाचवताना दुसराही बुडाला

वार्ताहर /देवरुख

  संगमेश्वर तालुक्यातील किरडुवे येथे विहीरीत बुडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. घराशेजारील विहीरीत पोहण्यासाठी उतरेलला तरूण बराच वेळ झाला तरी वर आला नाही म्हणून दुसऱया तरूणाने विहीरीत उडी घेतली. मात्र दोघांनाही यात प्राण गमवावा लागला. .

   अमोल वासुदेव पांचाळ यांनी याबाबत देवरुख पोलीसांना खबर दिली आहे. त्यानुसार गणशोत्सवानिमित्त गावाकडे आलेला स्वप्निल अनंत पांचाळ (34) हा घराशेजारील विहीरीत पोहण्यासाठी उतरला होता. मात्र बराच वेळ तो बाहेर न आल्याने संजय काशिराम बाईत (40) याने विहीरीत उडी घेतली. दोन वेळा वर आल्यावर स्वप्निल दिसला नाही म्हणून त्याने पुन्हा पाण्यात सुर मारला. मात्र तो  परत वर आलाच नाही.

  स्थानिकांच्या मदतीने काही वेळानंतर या दोघांनाही बाहेर काढण्यात आले. त्यानंतर देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू येथील डॉक्टर मुंगळकर यांनी दोघांनाही प्राथमिक तपासणानंतर मृत घोषित केले. या घटनेची नोंद देवरुख पोलीसांनी आकस्मिक मृत्यू अशी केली आहे

 स्वप्निल हा मुंबईत नोकरी करत होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुले असा परिवार आहे. तर संजय हा गावीच वास्तव्यास होता. याच्या पश्चात आई, 2 मुलगे, मुलगी आहे. दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. हेड कॉन्स्टेबल डी. एस. बाणे अधिक तपास करीत आहेत.

Related posts: