|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » देशभरात पावसाची सरासरीकडे वाटचाल

देशभरात पावसाची सरासरीकडे वाटचाल 

अर्चना माने-भारती/ पुणे

नैत्य मान्सून वारे अर्थात मान्सूनने ऑगस्ट महिन्यात लावलेल्या दमदार हजेरीमुळे सरासरीकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली असून, यंदाचा मान्सून समाधानकारक राहण्याची चिन्हे आहेत. साडेतीन महिन्यात दक्षिण, मध्य, पश्चिम  भागातील राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मात्र, उत्तरेकडील अनेक राज्यात पावसाची तूट असून, पूर्वोत्तर भारतही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या सरासरीपेक्षा 3 टक्के अधिक पाऊस नोंद झाला आहे.

यंदा 1 जून ते 12 सप्टेंबरची आकडेवारी पाहता देशात 789.7 मिमी इतका पाऊस होतो. मात्र, आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक 815.2 मिमी पाऊस झाला आहे. यामध्ये दादरा-नगर हवेलीमध्ये अतिवृष्टी म्हणजे सरासरीपेक्षा 69 टक्के अधिक पाऊस झाला आहे, तर महाराष्ट्र सरासरीपेक्षा 30 टक्के अधिक, कर्नाटक 23, गोवा 34, मध्य प्रदेश 28, राजस्थान 32, गुजरात 32, लक्षद्वीप 25, अंदमान निकोबार 39 टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे.

9 राज्ये अवर्षणग्रस्त

दुसरीकडे उत्तरेकडच्या बहुतांश राज्यात पावसाची कमतरता दिसून येत आहे. यात उत्तराखंड उणे 23, चंदीगड उणे 23, हरियाणा उणे 40, दिल्ली उणे 36, उत्तर प्रदेश उणे 25, बिहार उणे 23, झारखंड उणे 29, पश्चिम बंगाल उणे 24, नागालँड उणे 21 टक्के कमी पाऊस झाला आहे.

 

Related posts: