|Thursday, January 23, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » इस्रोला मिळतेय ‘नासा’च्या अनुभवाची साथ

इस्रोला मिळतेय ‘नासा’च्या अनुभवाची साथ 

विक्रम लँडरशी संपर्काचे नियंत्रण कक्षाकडून प्रयत्न सुरूच

वृत्तसंस्था/  बेंगळूर

संपर्क तुटल्यामुळे सध्या थांगपत्ता न लागलेल्या विक्रम लँडरचा शोध घेण्यासाठी ‘नासा’कडूनही प्रयत्न केले जात आहेत. चंद्राभोवती फिरत असलेल्या नासाच्या ऑर्बिटरकडून विक्रम लँडरचा शोध घेण्याचे कार्य सुरू आहे. नासाच्या ऑर्बिटरने यापूर्वी आपल्या कॅमेऱयात चंद्रावरील अनेक घडामोडी सूक्ष्मपणे टिपल्या आहेत. त्यामुळे विक्रम लँडरबद्दल ठोस माहिती मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. इस्रोच्या नियंत्रण कक्षाकडूनही लँडरशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्न सुरू असून आणखी सात-आठ दिवसांपर्यंत संपर्क प्राप्त करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी इस्रोच्या नियंत्रण कक्षाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यातच आता भारताच्या या चांद्रयान मोहिमेत इस्रोला नासाचीही साथ मिळाली आहे. विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी नासाने आपल्या डीप स्पेस नेटवर्कद्वारे (डीएसएन) नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीने लँडरशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी एक रेडिओ फ्रिक्वेन्सी पाठवली होती. या प्रयत्नांना यश मिळाल्यास लँडर आणि रोवरचे काम सुरू होऊन मोहिमेला गती मिळण्याची चिन्हे आहेत.

17 सप्टेंबर आशादायी दिवस…

17 सप्टेंबरला नासाचा ऑर्बिटर भारताचे ‘विक्रम लँडर’ असलेल्या भागातून जाणार आहे. त्यावेळी ऑर्बिटरमधून काढण्यात येणारी छायाचित्रे इस्रोकडे सोपवण्यात येतील. त्यावेळी विक्रमची नेमकी स्थिती काय आहे ते समजू शकेल. नासाच्या धोरणानुसार ‘एलआरओ’वरील सर्व डाटा वेबसाईटवर सर्वांसाठी उपलब्ध आहे. इस्रोला त्यांच्या विश्लेषणात मदत व्हावी यासाठी नासा विक्रम लँडरच्या लँडिंगच्या जागेचे फोटो इस्रोला पाठवणार आहे.

Related posts: