|Monday, September 23, 2019
You are here: Home » leadingnews » शाह, नड्डा यांच्या उपस्थितीत उदयनराजेंनी केला भाजपात प्रवेश

शाह, नड्डा यांच्या उपस्थितीत उदयनराजेंनी केला भाजपात प्रवेश 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

साताऱयाचे राष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज दिल्ली येथे गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जे. पी. नड्डा यांच्या उपस्थित भारातीय जनता पार्टीत प्रवेश केला.

मोदींच्या विचारांशी सहमत असल्यानेच आपण भाजपात प्रवेश केल्याचे उदयनराजेंनी म्हटले आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास उदयनराजे यांनी आपल्या खासदारपदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी जाऊन उदयनराजे यांनी खासदारपदाचा राजीनामा सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन हेही उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वीच उदयनराजे यांचे चुलत भाऊ आमदार शिवेंद्रराजे यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या साताऱयात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. साताऱयात पोटनिवडणूकीची अट मान्य केल्यानेच उदयनराजेंनी भाजपात प्रवेश निश्चित केला होता.