|Monday, February 24, 2020
You are here: Home » Automobiles » आर्थिक मंदी : महिंदा ऍन्ड महिंदा वाहन उत्पादन ठेवणार बंद

आर्थिक मंदी : महिंदा ऍन्ड महिंदा वाहन उत्पादन ठेवणार बंद 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जगभरात आर्थिक मंदीचे वारे वाहत असताना ऑटोमोबाईल क्षेत्राला त्याचा जोरदार फटका बसत आहे. अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांना कर्मचारीकपात करावी लागत आहे. तर काही ठिकाणी काम बंद ठेवावे लागत आहे.

टाटा मोटर्सनंतर आता महिंद्रा ऍन्ड महिंद्रा कंपनीनेही सध्याच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत विविध कारखान्यांमधील वाहन उत्पादन 8 ते 17 दिवसांपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने वाहनांची विक्री उत्पादनासोबत समायोजन करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. वाहनांवरील जीएसटी 28 टक्क्मयांवरून 18 टक्के करण्याची वाहन उद्योगाची मागणी गेल्याच आठवडय़ात एका समितीने फेटाळून लावली. त्यामुळे वाहन उद्योग अडचणीत आला आहे. मागील आठवडय़ात अशोक लेलँड या अवजड वाहन उत्पादन कंपनीनेही आपले उत्पादन बंद ठेवले होते. आर्थिक मंदीमुळे कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीलाही आपल्या 3000 कर्मचाऱयांची कपात करावी लागली होती.

Related posts: