|Saturday, February 22, 2020
You are here: Home » leadingnews » लादेनचा मुलगा ठार झाल्याच्या वृत्ताला ट्रम्प यांचा दुजोरा

लादेनचा मुलगा ठार झाल्याच्या वृत्ताला ट्रम्प यांचा दुजोरा 

ऑनलाइन टीम / न्यूयॉर्क : 

ओसामा बिन लादेनचा मुलगा व आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल-कायदाचा म्होरक्मया हमजा बिन लादेन ठार झाल्याच्या वृत्ताला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुजोरा दिला आहे.

हमजा बिन लादेन ठार झाला असल्याची गोपनीय माहिती अमेरिकेला मिळाली असल्याचे एनबीसी न्यूजने २ ऑगस्ट रोजी सांगितले होते. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या कारवाईत हमजा बिन लादेनचा खात्मा करण्यात आल्याचा पुरावा अमेरिकेला मिळाल्याचं एका अधिकाऱयाने सीएनएनला तेव्हा सांगितलं होतं. आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून हमजा बिन लादेनला ठार करण्यात आल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं आहे.

दरम्यान, हमजा बिन लादेनला नक्की कधी ठार करण्यात आले, हे स्पष्ट केले नाही.

 

Related posts: