|Saturday, December 14, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » मोबाईल वापरकर्त्यांसाठी वाहतुकीचे नियम लागू करण्याची वेळ

मोबाईल वापरकर्त्यांसाठी वाहतुकीचे नियम लागू करण्याची वेळ 

विविध देशांच्या प्रशासनांनी उचलले पाऊल

वृत्तसंस्था/ सिंगापूर

 1 सप्टेंबरपासून नवा मोटर व्हेईकल कायदा लागू झाला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड वसूल केला जातोय. नव्या कायद्यात मोबाईलवर बोलत असताना वाहन चालविल्यास मोठय़ा दंडाची तरतूद आहे. मोबाईलवर बोलत असताना वाहन चालविल्यास 5 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

हँड्सफ्री आणि ब्ल्यूटूथचा वापर करत मोबाईलवर संभाषण करताना आढळल्यासही दंड भरावा लागणार आहे. वाहन चालवताना मोबाईलचा वापर मोठी समस्या ठरली आहे. सिंगापूरमध्ये लोकांना चालतेवेळी स्मार्टफोनपासून लांब ठेवण्यासाठी स्टिकर बसविण्यात आले आहेत. या स्टिकर्सवर ‘लुक अप’ असा संदेश आहे. सर्वसाधारपणे लोक स्वतःच्या स्मार्टफोनला झुकून पाहत असतात, अशावेळी हा स्टिकर दिसून येतो. पायी चालताना स्मार्टफोनचा वापर न करण्याबद्दल लोकांना जागरुक करण्याचे काम सिंगापूरमध्ये केले जात आहे. ट्रफिक सिग्नलवरही पोस्टर लावण्यात आले आहेत. रस्ता ओलांडताना स्मार्टफोनचा वापर न करण्याची सूचना त्यावर आहे. सिंगापूर पोलिसांच्या मदतीने ही मोहीम राबविली जात आहे. अनेक देशांमध्ये स्मार्टफोनच्या जाळय़ात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

sदक्षिण कोरियात लेझर बीम

दक्षिण कोरियातील लोक स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर करतात. तेथे रस्त्यांवर चालू-बंद होणाऱया लाईट्स लावण्यात आल्या आहेत. लाइट्स पाहून रस्ता ओलांडताना लोकांनी सावध व्हावे आणि स्वतःची नजर स्मार्टफोनपासून हटवावी हा यामागचा उद्देश आहे. तेथील फूटपाथवर लाल-पिवळय़ा आणि ब्ल्यू एलईडी लाइट्स लावण्यात आल्या आहेत. रस्त्याशेजारी असलेल्या खांबांवर लेझर लाइट्स बसविण्यात आले आहेत. त्याच्या माध्यमातून स्मार्टफोन वापरणाऱयांना सतर्क केले जाते. एका ऍपच्या माध्यमातून वाहतुकीच्या क्षेत्रात पोहोचल्याची आणि मोबाईल खिशात ठेवण्याची सूचना केली जाते. वाहनचालकांना फ्लॅशिंग लाइट्सच्या माध्यमातून सतर्क केले जाते.

sतेल अवीवमध्येही उपाययोजना

इस्रायलच्या तेल अवीवमध्ये फूटपाथवर विशेष एलईडी लाईट्स बसविण्यात आल्या आहेत. या लाइट्स लोकांचे स्मार्टफोनवरील त्यांचे लक्ष विचलित करतात. मार्च महिन्यात तेल अवीवमध्ये हा प्रायोगिक प्रकल्प सुरू झाला आहे.

sनेदरलँडही दक्ष

युरोपीय देश असलेल्या नेदरलँडमध्ये रस्त्यांवर वाहतूक लाईट्स बसविण्यात आल्या आहेत. चालताना लोकांनी स्मार्टफोनचा वापर थांबवून रस्त्यावर लक्ष देण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. या लाइट्स वाहतुकीच्या हिशेबाने ग्रीन किंवा रेड होत राहतात.

sजर्मनीत मोठा दंड

जर्मनीमध्ये रस्त्यांच्या कडेला ग्राउंड ट्रफिक लाइट्स लावण्यात आल्या आहेत. अशाच प्रकारच्या लाइट्स रेल्वे स्थानकानजीकही लावण्यात आल्या आहेत. तेथे नियमांचा भंग करणाऱयांना मोठा दंड भरावा लागतो.

sबँकॉकमध्ये मोबाईल फोन लेन

थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये रितसर पहिला मोबाईल फोन लेन तयार करण्यात आला आहे. हा फूटपाथ विशेषकरून चालताना मोबाईल फोन वापरणाऱयांसाठी निर्माण करण्यात आला आहे. हा फूटपाथ स्मार्टफोन वापरतानाही सहजपणे ओलांडता येतो. विद्यार्थ्यांना स्मार्टफोनवर महत्त्वाचे विषय वाचता यावेत याकरता याची विशेष निर्मिती करण्यात आली आहे.

Related posts: