|Thursday, November 14, 2019
You are here: Home » क्रिडा » झेकची प्लिस्कोव्हा अंतिम फेरीत

झेकची प्लिस्कोव्हा अंतिम फेरीत 

वृत्तसंस्था/ झेंगझोयु

डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या झेंगझोयु खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत झेक प्रजासत्ताकच्या 27 वषींय कॅरोलिना प्लिस्कोव्हाने एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे.

2019 टेनिस हंगामात प्लिस्कोव्हाने आतापर्यंत पाच स्पर्धांमध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत द्वितीय मानांकित ऑस्ट्रेलियाच्या ऍजेला टॉमलेजेनोव्हिकचा 6-3, 6-2 अशा सरळ सेटस्मध्ये 70 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. क्रोएशियाच्या मार्टिकने उपांत्य फेरीत फ्रान्सच्या मॅलेडेनोव्हिकचा 6-0, 6-3 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. प्लिस्कोव्हा आणि मार्टिक यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. 28 वर्षीय मार्टिकने गेल्या एप्रिल महिन्यात डब्ल्यूटीए टूरवरील पहिली स्पर्धा जिंकली होती.

 

Related posts: