|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » leadingnews » गडचिरोलीत चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोलीत चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा 

ऑनलाईन टीम / गडचिरोली :

गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले. गडचिरोलीच्या कोरची तालुक्यातील ग्यारापत्ती जंगल परिसरात आज पहाटे ही घटना घडली.

सी-60 पथकातील पोलीस जंगल परिसरात नक्षलविरोधी मोहिम राबवत हेते. दरम्यान, नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले. मृत नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. पोलिसांच्या गोळीबारात काही नक्षलवादी जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे.

Related posts: