|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अंकलीत युवकाचा गळा दाबून खून

अंकलीत युवकाचा गळा दाबून खून 

बायकोची छेड काढल्याच्या रागातून कृत्य

प्रतिनिधी/ सांगली

बायकोची छेड काढल्याच्या रागातून बापू उर्फ विकी मधूकर मलमे (वय 20, रा. निलजी बामणी, ता. मिरज) या तरुणाचा गळा दाबून खून करण्यात आला. रविवारी दुपारी अंकली येथील अजित उर्फ पापा पाटील यांच्या शेतामध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत, त्यापैकी एकास सांगली ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान मयत बापू उर्फ विकी हा शुक्रवार (दि. 13 सप्टेंबर) पासून बेपत्ता होता.

पवन शीतल मलमे व किरण विजय मलमे (दोघेही रा. निलजी धामणी, ता. मिरज) अशी संशयितांची नावे आहेत. यापैकी किरण मलमे यास ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की मृत बापू उर्फ विकी व संशयित पवन आणि किरण हे एकाच भावकीतील आहेत. मृत विकीने किरणच्या बायकोची छेड काढली होती. याबाबत त्याला दोन वेळा समजही देण्यात आली होती. त्याचा राग किरणच्या मनात होता. दरम्यान शुक्रवार (13 सप्टेंबर) रोजी विकी सकाळी दहा वाजता घरातून निघून गेला होता. नातेवाईक त्याचा शोध घेत होते. दोन दिवसांच्या शोधानंतर तो बेपत्ता असल्याची फिर्याद अतुल संभाजी मलमे (रा. निलजी बामणी, ता. मिरज) यांनी रविवारी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती.

फिर्याद दाखल होताच पोलिसांनी विकीचा शोध सुरु केला होता. नातेवाईकही त्याच्या शोधात होते. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अंकली येथील अजित उर्फ पापा पाटील यांच्या मळी रस्त्यावर शेतात आढळून आला. नातेवाईकांनी याची माहिती सांगली ग्रामीण पोलिसांना दिली. ग्रामीणचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्यासह कर्मचाऱयांनी घटनास्थळी जात मृतदेहाचा पंचनामा केला. येथील वसंतदादा पाटील शासकिय रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मृत बापू उर्फ विकी याचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये समोर आलले आहे.

दरम्यान, शुक्रवारी विकी दुचाकीवरुन पवन व किरण यांच्याबरोबर गेल्याचे दोघांनी पाहिले होते. त्यांच्या माहितीवरुन सांगली ग्रामीण पोलिसांनी तपासाची चपे वेगाने फिरवत यापैकी किरण मलमे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान मृत विकीने संशयित किरणच्या बायकोची छेड काढली होती. याबाबत त्याला किरणने दोनदा समजही दिली होती. हा राग किरणच्या मनात होता. शुक्रवारी घरातून बाहेर पडल्यानंतर तिघांनी अंकली येथील एका दारुच्या दुकानात दारु प्राशन केली. त्यावेळी याच कारणावरुन किरण आणि विकी या दोघांच्यामध्ये वाद झाला. त्यातून किरण आणि पवन याने त्याला दुचाकीवरुन अंकली येथील शेतामध्ये नेले. तिथे त्यांनी विकीचा गळा दाबून खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये समोर आले आहे.

विकी सेंट्रीग कामगार

मृत विकी मलमे हा सेंट्रीग कामगार होता. संशयित किरण आणि पवन हे त्याच्या भावकीतीलच आहेत. किरणच्या बायकोची त्याने छेड काढली होती. याबाबत विकीला दोनदा समजही देण्यात आली होती. पण, किरणच्या मनात याचा राग खदखदत होता. त्यातूनच विकीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये समोर आले आहे.

Related posts: