|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आगरवाडा चोपडे येथे आग लागून दहा लाख रुपयांचे नुकसान

आगरवाडा चोपडे येथे आग लागून दहा लाख रुपयांचे नुकसान 

प्रतिनिधी/ पेडणे

आगरवाडा चोपडे येथे  दुचाकी सामान ठेवलेल्या गोडावनला आग लागून सुमारे 10 लाख रुपयाचे नुकसान झाले.

     पेडणे अग्निशमन कार्यालयाकडून मिळालेल्या माहिती नुसार आगरवाडा चोपडे येथील चंद्रकांत नारायण कोठावळे यांच्या  मालकिचे घर हे मुख्य रस्त्याच्या  बाजूला आहे.  घरातील पहिल्या मजल्यावर दुचाकी वाहनाच्या सामानाच्या गोडाव  आहे . तर घरातीलपेडणे मंडळी ही तळमजल्यावर राहत होती.  या गोडावनला आग लागून किमान  सुमारे 10  लाख रुपयाचे नुकसान झाले .  पेडणे आणि म्हापसा अग्निशमन दलाच्या दोन बंबाला आग विजावण्यासाठी दोन तास लागले , जवानांनी अथक परिश्रमातून  सुमारे  20 रुपयांची मालमत्ता वाचवण्यास यश मिळवले .

 

रविवारी  15 रोजी सकाळी पावणे एकरा वाजता घराच्या पहिल्या मजल्यावर कानठीळय़ा बसवणारा  असा परिसरात स्पोट झाला .हा स्फोट  वीज इंनवटरचा झाल्याने लगेच आग सर्वत्र पसरली.  स्पोट होवून पहिल्या मजल्याला आग लागली . पहिल्या मजल्यावरील तीन  खोल्यांमध्ये दुचाकी वाहनांचे सुटे महागडे भाग , इंधन ड ऑईल . ऑईलच्या बाटल्या केन , विविध सुटे भाग या खोल्यामध्ये होते . त्याला आग लागून पूर्ण सामान जाळून खाक झाले . आगीने सर्वत्र  पेट घेतल्याने   पहिल्या मजल्यावरील लाकडी छप्पर पूर्णपणे  जाळून कोले गळून पडली . भिंतीचे पूर्ण सिमेंट जळून बांधकामाचे चिरे उघडे पडले .

आगीची कल्पना  त्वरित पेडणे आग्निशमन कार्यालयाला कोणीतरी संपर्क साधून  देण्यात आली. म्हापसा येथीलही अग्निशमन कार्यालयाला माहिती मिळताच पेडणे   आणि म्हापसा अग्नी बंब घटनास्थळी पोचले . माञ त्यावेळी वरच्या माजला  पूर्ण आगीने व्यापला    होता.  जवानांनी गांभीर्य ओळखून  अथक परिश्रम आग  वीजवण्याचा प्रयज्ञ केला ,मात्र जाळून खाक झाले होते मात्र आग तळमजल्यावर येत  आसलेली आग पाण्याचे बंब मारुन   येण्यापासून जवानांनी रोखून धरली दोन तास प्रयत्न  करून आग विजावण्यात यश मिळवले आणि तळमजला वाचवला .

आग लागली तेव्हा सकाळी  घरातील पुरुष मंडळी नरसोबावाडी कोल्हापूर तीर्थाला कुणीतरी नातेवाईक वारल्याने ती मंडळी घरात नव्हती घरात पत्नी व मुलगी होती . स्पोट झाल्याचा आवाज ऐकून  त्या बाहेर आल्या त्यावेळी पहिल्या मजल्यावर धूर येत असलेला पाहून त्या बाहेर आल्या. म्हापसा आणि पेडणे येथून दोन बंब घटनास्थळी पोचले . हळू हळू नागरिकही गर्दी करू लागले .  सर्वत्र दूर पसरल्याने  गोंधळ व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते . पेडणे अग्निशमन दलाचे अधिकारी नामदेव परवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद गवंडी , विशाल पाटील , अविनाश नाईक ,  संदेश पेडणेकर तर म्हापसा  आग्निशमन कार्यालयाचे  सुरज शेटगावकर , प्रकाश घाडी ,  योगेश आमोणकर, नितीन मयेकर यांनी अथक परिश्रम करुन ही आग विझविली.

 

Related posts: