|Friday, December 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » रतुल पुरीच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ

रतुल पुरीच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ 

नवी दिल्ली

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरी याच्या ईडी कोठडीमध्ये आणखी तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वीची कोठडीची मुदत संपल्यामुळे विशेष सीबीआय न्यायालयाने त्यांच्या कोठडीत आणखी वाढ करण्याचा निर्णय घेतला. ऑगस्टा वेस्टलँडमधील व्यवहारात रतुल पुरी यांचा सहभाग असल्याचे चौकशीतून उघड होत असून त्यांची आणखी चौकशी होण्याची गरज असल्याचे मत ईडीच्या वकिलांनी न्यायालयात मांडले. त्यामुळेच त्यांच्या कोठडीत न्यायालयाने वाढ केली.

Related posts: