|Sunday, December 15, 2019
You are here: Home » leadingnews » पीएफवर मिळणार आता 8.65 टक्के व्याज

पीएफवर मिळणार आता 8.65 टक्के व्याज 

ऑनलाइन टीम /नवी दिल्ली : 

केंद्र सरकारने 2018-19 या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीच्या अधिक सदस्यांसाठी खूशखबर दिली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं पीएफवरील व्याजदर वाढीला मंजुरी दिली आहे. पीएफवर 8.65 टक्के दराने व्याज मिळणार आहे. अशी माहिती रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी मंगळवारी दिली.

सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने मागील आर्थिक वर्षासाठी 8.65 टक्के व्याजदरास फेब्रुवारीमध्ये मंजुरी दिली होती. त्यानंतर हा व्याजदर वाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवला होता. ‘ईपीएफओच्या सहा कोटींहून अधिक सदस्यांना 2018-19 या आर्थिक वर्षासाठी जमा रकमेवर 8.65 टक्के व्याज मिळणार आहे. वर्तमान स्थितीत ईपीएफओ खात्यांमधील दाव्यांचा निपटारा 8.55 टक्के व्याजदराने केला जात आहे. हे दर 2017-18 या आर्थिक वर्षासाठी होते. या वर्षातील व्याजदर पाच वर्षांतील सर्वात कमी होते. 2016-17 मध्ये व्याजदर 855 टक्के, 2013-14 आणि 2014-15 मध्ये कर्मचाऱयांना 8.75 टक्के व्याज मिळाला होता.

 

Related posts: