|Monday, January 20, 2020
You are here: Home » leadingnews » मी लवकच भाजपमध्ये जाणार : नारायण राणे

मी लवकच भाजपमध्ये जाणार : नारायण राणे 

ऑनलाइन टीम /सिंधुदुर्ग : 

मी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार अशी माहिती नारायण राणे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रा आज, मंगळवारी सिंधुदुर्गात पोहोचली. या यात्रेचं नारायण राणे यांनी स्वागत केलं. यावेळी नारायण राणे यांनी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं.

ते म्हणाले, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलिन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नितेश राणेसह महाराष्ट्र स्वाभिमानचे कार्यकर्ते भाजपच्या तिकीटावरच विधनसभा निवडणूक लढणार आहेत. मात्र आपण स्वतः निवडणूक लढवणार नाही असे ही नारायण राणे यावेळी स्पष्ट केले. तसेच भाजपमध्ये जाण्यासाठी कोणतीही अट ठेवली नसून कोणतीही मागणी केली नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांच्या प्रवेशाबद्दल कोणतेही भाष्य केले नसून मौन पाळले आहे.

Related posts: