|Sunday, January 26, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » पाकमध्ये हिंदू विद्यार्थिनीचा मृत्यू

पाकमध्ये हिंदू विद्यार्थिनीचा मृत्यू 

कुटुंबाने व्यक्त केला हत्येचा आरोप : पाकमधील अल्पसंख्याकांवर अत्याचार

वृत्तसंस्था/ कराची 

 पाकिस्तानात वैद्यकीय शिक्षण घेणाऱया एका हिंदू विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. नम्रता चंदानी असे मृत युवतीचे नाव असून ती लरकाना येथील बीबी आसिफा दंतवैद्यकीय महाविद्यालयात शिकत होती. नम्रताचा मृतदेह गळय़ात दोरखंड बांधलेल्या स्थितीत मिळाला आहे.

नम्रताने आत्महत्या केली की तिची हत्या झाली हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांदरम्यान वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मृत्युमुळे नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचे विधान नम्रताचा भाऊ डॉक्टर विशालने केले आहे. नम्रता मीरपूर जिल्हय़ातील घोटकी येथील रहिवासी होती. तिचे कुटुंब सध्या कराची येथे वास्तव्यास आहे. नम्रताच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असला तरीही खिडकी खुली होती. पंखा किंवा अन्य कुठल्याही वस्तूला दोरखंड बांधण्यात आल्याचा पुरावा न मिळाल्याने हत्येचा संशय बळावला आहे. महाविद्यालय प्रशासन याला आत्महत्या ठरविण्याचा प्रयत्न करत असले तरीही पुरावे हत्या झाल्याचे संकेत देत आहेत. मागील काही आठवडय़ांमध्ये पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर सातत्याने अत्याचार होत असून त्यांचे बळजबरीने धर्मांतर घडविले जात आहे. सप्टेंबरच्या प्रारंभी एका शीख मुलीचे अपहरण करत तिचा मुस्लीम युवकाशी बळजबरीने विवाह लावून देण्यात आला होता. अशाच प्रकारे 15 वर्षीय ख्रिश्चन मुलीचे बळजबरीने धर्मांतर घडवून आणले होते. तर एका हिंदू विद्यार्थिनीचे अपहरण करत मुस्लिमासोबत विवाह करण्याची तिच्यावर बळजबरी करण्यात आली होती. पाकिस्तानात बळजबरीने धर्मांतर घडविण्यावर बंदी घालणारा कुठलाच कायदा नाही.

Related posts: