साताऱयात गळफास घेऊन एकाची आत्महत्या

प्रतिनिधी/ सातारा
येथील राधिका रस्त्यावर असलेल्या बसाप्पापेठेत गळफास घेऊन एकाने आत्महत्या केली आहे. रामचंद्र सोना आगरेकर (वय 50, रा. बसप्पा पेठ, राधिका रोड, सातारा) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची प्राथमिक नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत रुग्णालयीन पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास रामचंद्र सोना आगरेकर यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून घेतला. ही घटना निदर्शनास येताच नातेवाईकांनी त्यांचा गळफास सोडवला आणि त्यांना तत्काळ सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
Related posts:
Posted in: सातारा