|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » प्राथमिक शिक्षक भरतीमध्ये घोळ केल्याचा संशय

प्राथमिक शिक्षक भरतीमध्ये घोळ केल्याचा संशय 

सरकारने खुलासा करण्याची उमेदवारांची मागणी

प्रतिनिधी/ पणजी

सरकारी प्राथमिक शिक्षकांच्या शिक्षण खात्यातर्फे जारी करण्यात आलेल्या भरतीच्या अंतिम यादीत काहीतरी घोळ झाल्याचे काही उमेदवारांचे म्हणणे असून त्यासंदर्भात खात्याने खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार 182 पदे भरण्यासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यावेळी उमेदवारांना जे गुण मिळाले त्यांची यादी सर्वसाधारण गट, एससी, एसटी, व इतर मागासवर्गीय (ओबीसी) अशी वेगळी देण्यात आली होती. परंतु आता अंतिम यादी जाहीर करताना 182 ऐवजी 158 जणांचीच यादी देण्यात आली असून काही एससी, एसटी, ओबीसी उमेदवारांची नावे सर्वसाधारण गटातील यादीत घालण्यात आल्याबद्दल आश्चर्य प्रकट करण्यात येत आहे.

सर्वसाधारण गटातील 24 पदे कधी भरणार

शिक्षकांच्या 182 पदामध्ये 91 पदे सर्वसाधारण गटासाठी होती. त्यातील 67 पदेच भरण्यात आली आहेत. उर्वरित म्हणजे 24 पदे (सर्वसाधारण गट) का भरण्यात आली नाहीत? असा प्रश्न अनेक उमेदवारांना पडला असून ती केव्हा भरणार? ते खात्याने स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

गुणांच्या यादीत पुढे असलेल्यांना वगळले

अनेक उमेदवारांना प्रतीक्षा यादीत टाकण्यात आले असून त्यांना नोकरी मिळणार की नाही? असा संभ्रम संबंधीत उमेदवारांमध्ये निर्माण झाला आहे. मिळालेल्या गुणांनुसार यादीत पुढे असलेले काही उमेदवार मागे फेकले गेले असून प्रतीक्षा यादीत ठेवल्यामुळे त्यांच्यात अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.

Related posts: