|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » उदयनराजेंविरोधात कोण उतरणार रिंगणात ?; ‘ही’ नावे आली चर्चेत

उदयनराजेंविरोधात कोण उतरणार रिंगणात ?; ‘ही’ नावे आली चर्चेत 

ऑनलाईन टीम / सातारा :

सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्या विरोधात कोणाला रिंगणात उतरवायचे हा प्रश्न आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्याची चाचपणी सुरु झाली आहे.

उदयनराजे भोसले यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याबाबतचे संकेत दिले आहेत. विधानसभा निवडणुकीवेळी ही पोटनिवडणूक होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यासाठी उदयनराजेंविरोधात साताऱयात कोणाला रिंगणात उतरवायचे असा प्रश्न विरोधी पक्षांना पडला आहे.

उदयनराजेंच्या विरोधात रिंगणात उतरण्यास काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नकार दिल्याने माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, नितीन लक्ष्मणराव पाटील, अविनाश मोहिते यांची नावे चर्चेत आली आहेत.

Related posts: