|Sunday, March 29, 2020
You are here: Home » विशेष वृत्त » मृत्युंजय प्रतिष्ठानची पुरग्रस्तांना मदत

मृत्युंजय प्रतिष्ठानची पुरग्रस्तांना मदत 

पुणे /प्रतिनिधी : 

मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या पुण्यतिथीनिमित्त 18 सप्टेंबरला मृत्युंजय प्रतिष्ठानच्यावतीने साहित्य आणि समाजविषयक असे दोन पुरस्कार यंदा स्थगित करण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या बहुसंख्य भागात महापुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे.

या पुरस्काराची आणि कार्यक्रमाची सुमारे 50 हजार रुपये रक्कम पूरग्रस्त कुटुंबाला देण्यात येणार आहे. त्यामुळे  हा पुरस्काराचा कार्यक्रम यंदा होणार नसून, पुढील वर्षी तो नियमित होईल. असे प्रतिष्ठानच्यावतीने डॉ. सागर देशपांडे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे. या आधी मराठवाडय़ातील भीषण दुष्काळाच्या वेळी देखील प्रतिष्ठानने कार्यक्रम स्थगित करून त्याची रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी दिली होती, असेही डॉ. देशपांडे यांनी सांगितले.

Related posts: