|Sunday, December 15, 2019
You are here: Home » उद्योग » एलईडी पॅनेलच्या खुल्या विक्रीवरील आयात शुल्क हटवले

एलईडी पॅनेलच्या खुल्या विक्रीवरील आयात शुल्क हटवले 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सरकारने देशातील उत्पादनास चालना देण्यासाठी एलईडी टीव्हीवरील खुल्या विक्रीवरील आयात शुल्क 5 टक्क्यांनी कमी केले आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये ग्राहकांना विशेष भेट मिळणार आहे. टीव्ही उत्पादकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून आगामी काळात भारतामध्ये टीव्ही उत्पादनास चालना  मिळणार असल्याचेही स्पष्टीकरण दिले आहे.

एलसीडी आणि एलइडी विक्री

एलसीडी व एलईडी टीव्हीच्या खुल्या विक्रीवरील आयात शुल्क शुन्यावर आणला असून चिप ऑन फिल्म, प्रिन्टेड सर्किट बोर्ड आदीवरील शुल्कही कमी केल्याचे अर्थमंत्रालयाने एका पत्रकाद्वारे सांगितले आहे.

 2017 मध्ये आयात शुल्काची आकारणी

सरकारने 30 जून 2017 रोजी टीव्ही पॅनेलवरील आयातीवर 5 टक्क्यांचे शुल्क आकारले होते. त्यावेळी कन्झ्युमर ऍण्ड टीव्ही उत्पादन असोसिएशन्स व अन्य कंपन्यांनी मोठय़ा प्रमाणात विरोध केला होता. दुसरीकडे भारतीय टेलिव्हीजन बाजाराची उलाढाल जवळपास 22 हजार कोटी रुपयाची आहे. मात्र तिलाही मंदीचा फटका बसला आहे.

 

टीव्ही उत्पादन क्षेत्रात उत्साह

टीव्ही उत्पादन उद्योगाने सरकारच्या या निर्णयांचे स्वागत केले आहे. किमत कमी झाल्यावर त्याचा फायदा ग्राहकांना होणार असून देशातंर्गत उत्पादन वाढवण्यास मोठी मदत मिळणार असल्याचे पॅनासॉनिक इंडियाचे दक्षिण आशियाचे उपाध्यक्ष मनीष शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.

Related posts: